Maharashtra Municipal Elections 2025 : राज्यात 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Maharashtra Municipal Elections 2025 : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील मुंबई, ठाणे यांच्यासह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा करताच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोकळा झाला आहे.

या आधी 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर आता उर्वरित 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.

महापालिका निवडणूक वेळापत्रक 2025

टप्पातारीख
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी31 डिसेंबर
उमेदवारी माघार2 जानेवारी
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी3 जानेवारी
मतदान15 जानेवारी
निकाल16 जानेवारी

या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदार व निवडणूक यंत्रणा माहिती

घटकसंख्या
एकूण मतदार3.48 कोटी
एकूण मतदान केंद्रे39,147
मुंबईतील मतदान केंद्रे10,111
कंट्रोल युनिट11,349
बॅलेट युनिट22,000

या निवडणुकीसाठी राज्यभरात 1,96,605 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या आधी 48 तास प्रचार व जाहिरातींवर पूर्ण बंदी असेल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

निवडणूक खर्च मर्यादा

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

महापालिका वर्गखर्च मर्यादा
अ वर्ग (मुंबईसह)15 लाख रुपये
ब वर्ग13 लाख रुपये
क वर्ग11 लाख रुपये
ड वर्ग9 लाख रुपये

मतदान पद्धत व उमेदवारी अर्ज

मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्या प्रमाणे मतदान करावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक राहील.

मतदार जनजागृती व सुविधा

मतदार जनजागृतीसाठी विशेष रील्स तयार करण्यात आल्या आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हील चेअर यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आरक्षण व जागा वाटप

राज्यातील 29 महापालिकांसाठी एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे.

आरक्षण प्रकारजागा
महिला1,442
इतर मागासवर्गीय759
अनुसूचित जाती341
अनुसूचित जमाती77

मुंबई महापालिका : दुबार मतदारांसाठी विशेष चिन्ह

मुंबईमध्ये सुमारे 11 लाख संभाव्य दुबार मतदार असून ते एकूण मतदारसंख्येच्या सुमारे 7 टक्के आहेत. या मतदारांच्या नावासमोर दोन स्टार चिन्ह असणार आहे. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, मतदान कुठे करणार याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्वेक्षण झाला नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतले जाणार आहे.

कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?

अनुक्रमांकमहापालिकाजागा
1बृहन्मुंबई227
2भिवंडी-निजामपूर90
3नागपूर151
4पुणे162
5ठाणे131
6अहमदनगर68
7नाशिक122
8पिंपरी-चिंचवड128
9औरंगाबाद113
10वसई-विरार115
11कल्याण-डोंबिवली122
12नवी मुंबई111
13अकोला80
14अमरावती87
15लातूर70
16नांदेड-वाघाळा81
17मीरा-भाईंदर96
18उल्हासनगर78
19चंद्रपूर66
20धुळे74
21जळगाव75
22मालेगाव84
23कोल्हापूर92
24सांगली-मिरज-कुपवाड78
25सोलापूर113
26इचलकरंजी76
27जालना65
28पनवेल78
29परभणी65

ही निवडणूक राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.

Leave a Comment